एमसीडीचे चार अधिकारी तसेच स्वेका पॉवर टेकचे कार्यकारी संचालक पी.पी. सिंह अशा पाचजणांचा शिक्षा झालेल्यांमध्ये समावेश आहे. सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायमूर्ती ब्रिजेश गर्ग यांनी ही शिक्षा सुनावली आहे. 2010 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामधील घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 10 खटले दाखल करण्यात आले आहेत. शिक्षा झालेला हा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पहिलाच घोटाळा आहे. सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयात दोषींना जास्तीत जास्त म्हणजे 7 वर्षाच कारावासाची शिक्षा ठोठावण्याची मागणी केली होती. त्यापूर्वी न्यायालयाने संबंधित पाचजणांना दोषी ठरविले होते. आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात कमीतकमी शिक्षा देण्याची विनंती केली होती.