मणिपूरमधील रस्त्याला मेरी कॉमचे नाव

PR
लंडन ऑलिम्पिकमध्ये मुष्टियुद्धात भारताला कांस्यपदक पटकावून देणारी महिला मुष्टियुद्धपटू एम.सी. मेरी कॉमच्या सन्मानार्थ मणिपूरमधील एका रस्त्याला मेरी कॉम रिंग रोड, असे नाव देण्यात आले आहे.

मणिपूरच्या चुरचंदपूर जिल्ह्यात मेरी कॉमचे मूळ घर आहे. त्यामुळे चुरचंदपूर आणि उपजिल्ह्याधिकारी कार्यालय यांना जोडणार्‍या रस्त्याला 'मेरी कॉम रिंग रोड' असे नाव देत असल्याची घोषणा राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री टी. फुंगझ्तांग यांनी मेरी कॉमच्या सन्मानार्थ आयोजिण्यात एका विशेष सोहळ्यात ही घोषणा केली.

वेबदुनिया वर वाचा