भारतीय हॉकी संघ नशीबवानच: अजितपाल

बुधवार, 9 डिसेंबर 2015 (10:16 IST)
नवी दिल्ली - वर्ल्ड हॉकी लीग फायनल्स स्पर्धेतील साखळी गटात भारतीय हॉकी संघाची अवस्था अक्षरशः दयनीय होती. तरीदेखील या स्पर्धेत ते ब्राँझपदकाचे मानकरी ठरले. याबाबत भारतीय संघाला नशिबवानच म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार अजितपाल सिंग यांनी व्यक्त केली.
 
भारतीय संघाच्या यशाबद्दल बोलताना अजितपाल यांनी स्पर्धेच्या स्वरूपाकडे बोट दाखवले. ते म्हणाले, ‘‘स्पर्धेचे स्वरूप असे होते, की सर्व सहभागी आठही संघ साखळी लढती खेळूनही उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार होते. साखळी लढतीत भारताची कामगिरी दयनीय होती. पण, स्पर्धेचे स्वरूप बघता काही घडू शकत होते, झालेदेखील तसेच. भारताने आपली कामगिरी उंचावली. 

वेबदुनिया वर वाचा