अगरतळा- रिओ ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकर हिने तिला भेट म्हणून मिळालेली बीएमडब्ल्यू कार परत करण्याचे वक्तव्य आपण केलेच नाही, असे स्पष्ट केले आहे. सचिन तेंडुलकरच्या हस्ते भेट मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे ती भेट परत करण्यचा मी विचारही करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया दीपाने दिली.