फुटबॉल वर्ल्डकपच्या भविष्यवाणीसाठी ‘पांडा’ तयार

गुरूवार, 5 जून 2014 (12:02 IST)
चीनमध्ये विश्वकपच्या मॅचचे रिझल्ट अगोदरच माहीत पडणार आहेत.. नाही नाही.. हे मॅच फिक्सिंगचं प्रकरण नाही बरं का तर, फुटबॉल वर्ल्डकपच्या निकालांच्या भविष्यवाणीसाठी पांडाच्या मुलांचा उपयोग केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फुटबॉलचा भविष्यवक्ता ‘पॉल द ऑक्टोपस’च्या निधनानंतर आता चीनचे लोक पांडाकडून भविष्यवाणी वदवून घेणार आहेत. प्रसारित झालेल्या बातम्यांनुसार, पांडा एका टोपल्यातून आपल्या पसंतीचं खाणं निवडून आणि झाडांवर चढून मॅचच्या विजेत्या टीमबद्दल भविष्यवाणी करणार आहे. पांडा खाण्यासाठी काय निवडतो यावर मॅचमध्ये विजय, पराभव किंवा ड्रॉ होईल याबद्दल भविष्यवाणी केली जाईल. नॉकआऊट राउंडच्या निकालासाठी पांडा झाडावर लावण्यात आलेल्या झेंडय़ांमधून ज्या टीमच्या झेंडय़ांना निवडेल त्या टीमला विजेती टीम म्हणून घोषित करण्यात येईल. जर्मनीच्या पॉल ऑक्टोपसनं 2010 वर्ल्डकपमध्ये अनेक निकालांची अचूक अशी भविष्यवाणी केली होती.

वेबदुनिया वर वाचा