नुकत्याच झालेल्या प्रो कबड्डी लीगमध्ये अनेक सामन्यांचे फिक्सिंग झाले असून या लीगचा अंतिम विजेता जयपूरचा पिंक पॅँथरचठरेल, असा माझा आरोप सिद्ध झाला आहे. गेल्या ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी आपण केलेले आरोप १०० टक्के खरे ठरले असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्ता पाथ्रीकर यांनी एका मराठी वृत्तपत्राशी बोलानांना केला आहे.
जयपूरचा संघ कबड्डीचे राष्ट्रीय अध्यक्ष जनार्दन गेहलोत यांच्या राज्यातील आहे. तसेच या पिंक पॅँथर्सला बच्चन कुटुंबीयाने विकत घेतले आहे. त्यामुळे बच्चन कुटुंबीयांतील अभिषेक बच्चन, ऐश्वर्या बच्चनच्या प्रेक्षागृहातील उपस्थितीनेदेखील प्रो लीग कबड्डीचे वलय वाढत असल्याचा दुहेरी फायदा लक्षात घेऊनच ही चाल खेळण्यात आली असल्याचा आरोपदेखील पाथ्रीकर यांनी केला आहे.