यावेळी खेळाडूंनी पंतप्रधानांसोबत सेल्फी घेण्याची हौस भागवली. दरम्यान, अनेक खेळाडू सरावासाठी विदेशात असल्यामुळे त्यांना या कार्यक्रमात सहभागी होता आले नाही. भारताचे आॅलिम्पिकमध्ये प्रथमच १०० पेक्षा अधिक खेळाडूंचे पथक सहभागी होणार आहे.
यावेळी क्रीडामंत्री जितेंद्र सिंग, क्रीडा सचिव राजीव यादव, अखिल भारतीय क्रीडा परिषदेचे अध्यक्ष विजय कुमार मल्होत्रा, भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष एन. रामचंद्रन, महासचिव राजीव मेहता, हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा आणि सचिव मुश्ताक मोहम्मद प्रामुख्याने उपस्थित होते.