ऑलिम्पिअगोदर ज्वालाचे लक्ष तंदुरूस्तीवर

गुरूवार, 28 जून 2012 (18:39 IST)
PR
PR
ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करण्याबाबत आश्वस्त स्टार बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने सद्या तंदुरूस्तीवर लक्ष केंद्रित केल्याचे सांगितले. आपणांस दोन स्पर्धांमध्ये खेळायचे असल्याने तंदुरूस्ती निर्णायक ठरणार आहे.

२७ जुलैपासून सुरू होणार्‍या या खेळाच्या महाकुंभात ज्वाला महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीत खेळणार आहे. माझ्याकडून पदकाची आशा आहे. मात्र आपल्यावर याचा दबाव नसून मोठ्या स्पर्धांमध्ये खेळणे आपणांस पसंत असल्याचे तिने सांगितले. आपण निश्चितच सर्वश्रेष्ठ का‍मगिरी नोंदवू, असा विश्वास तिने व्यक्त केला.





वेबदुनिया वर वाचा