जागतिक चौथ्या क्रमांकावरील अॅण्डी मुरे याने अलेक्झांडर डोलगोपोलोव्ह याचा अंतिम फेरीतील लढतीत केवळ 65 मिनिटातच फडशा पाडत ब्रिस्बेन इंटरनॅशनल अजिंक्यपद पटकावले.
मुरे याने जागतिक चौदाव्या क्रमांकाच्या युक्रेनच्या अलेक्झांडर डोलगोपोलोव्हला 6-1, 6-3 असे पराभूत केले. या विजयाने मुरे याने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील आपणही एक प्रबळ दावेदार असल्याचा संदेशही दिला आहे.