केनियाच्या रुडिशाचा विश्वविक्रम

केनियाचा मध्यम पल्ल्याचा धावपटू डेव्हिड रुडिशा याने मैदानी स्पर्धेतील 800 मीटर शर्यतीत विश्व विक्रमाची नोंद करून सुवर्णपदकाचा बहुमान मिळवला. रुडिशाने एक मिनिट आणि 40.91 मिनिटात ही शर्यत पूर्ण केली. त्याने यापूर्वीचा आपलाच विक्रम मागे टाकला. बोटसवानाचा युवा अ‍ॅ‍थलिट निजेल अ‍ॅमोसने एक मिनिट आणि 41.73 सेकंदाची वेळ नोंदवत रौप्यपदकावर आपले नाव कोरले. केनियाच्या टिमोथी किटूम याने कांस्यपदक पटकावले.

वेबदुनिया वर वाचा