सचिन रमेश तेंडुलकर. जगातला एक महान फलंदाज. आणि आपल्या सगळ्यांचा लाडका सचिन. सचिनबद्दल काही 'अनडिस्क्लोज्ड'...
सचिनचं नाव प्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या नावावरुन ठेवण्यात आलं.
सचिन लहानपणी टेनिस स्टार मॅकेन्रोचा खूप मोठा चाहता होता.
सचिनला लहानपणी वेगवान गोलंदाज बनायचं होतं. प एमआरएफ पेस एकेडमीमध्ये डेनिस लिलीने त्याला बॅटींगवर लक्ष द्यायला सांगितलं.
सचिनने आपल्या पदार्पणाच्या रणजी, दुलीप आणि इराणी सामन्यांमध्ये शतक ठोकलंय. ही कामगिरी करणारा सचिन हा एकमेव खेळाडू आहे.
लहानपणी झोपताना तो आपलं क्रिकेट कीट बाजूला ठेवून झोपायचा.
सचिनने वयाच्या १६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पदार्पण केलं.
लहानपणी गाईड सिनेमा पहाण्यासाठी तो एका झाडावर चढून बसलेला अस्ताना तो झाडावरुन पडला. त्याची शिक्षा म्हणून त्याच्या भावाने अजितने त्याला क्रिकेट क्लासला पिटाळलं.
सचिन वडा पावचा खाण्याचा रेकॉर्ड करु शकतो. मित्रांसोबत वडा पाव खाण्याच्या पैजा लावायलाही तो नेहमी तयार असतो.
सचिन आता जरी शांत दिसत असला तरी लहानपणी बराच खोड्कर होता. शाळेत असताना कोणाशीही ओळख झाली की त्याच्या मनात पहिला विचार यायचा ’मी ह्याला मारु शकेल का?’.
खोड्या काढायची सवय त्याची अजुनही गेली नाही. एकदा त्याने सौरव झोपलेला असताना त्याच्या रुममध्ये पाण्याचा पाइप सोडून दिला होता. सौरव उठला तेव्हा रुममधलं सगळं सामान पाण्यावर तरंगत होतं. सचिन सौरवला बाबूमोशाय आणि सौरव त्याला छोटे बाबू म्हणुन हाक मारतो.
१० वर्षांपूर्वी शारजामध्ये वादळाला तोंड देत सचिनने स्वतःच्या बॅटींगमधून जे वादळ निर्माण केलं, ते गारूड अजूनही मनावरून उतरलेलं नाही.
सचिनबद्दल खूप काही लिहिलं गेलंय आणि खूप काही लिहिलं जाईल. पण अशी कितीही वर्ष गेली तरी सचिन आपल्या सगळ्यांसाठी सचिनच राहील.सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!