श्रीयंत्र शक्तीचे प्रतीक असून हे या मंदिरात प्रतिष्ठित आहे. या जागेचं खूप महत्व आहे कारण असे मानले आहेत की जेव्हा सती आमंत्रणाविना वडीलांच्या घरी गेली तर तिथे दक्ष द्वारे तिच्या नवर्याचा झालेला अपमान तिला सहन झाला नाही. तिने आपली देह स्वत: भस्म केली. नंतर जळत असलेल्या सतीला महादेव आपल्यासोबत घेउन जात असताना तिच्या हाताचा कोपरा येथे पडला होता.