मुलांसाठी लोहडी आनंदाचा सण असतो. दिवसभर मुले या लोहडीच्या तयारीत व्यस्त असतात. रात्री एका ठिकाणी होळी पेटवली जाते. तेथे सगळे कुटुंब जमा होते. मग या अग्नीची पूजा केली जाते. त्याभोवती प्रदक्षिणा घातली जाते. त्यानंतर प्रसाद वाटला जातो. प्रसादामध्ये तीळ, गजक, गुळ, शेंगदाणे व मक्याच्या लाह्या यांचा समावेश असतो.
अग्नी प्रज्ज्वलित केल्यानंतर त्याच्या सभोवताली तांदूळ, रेवडी आणि साखरफुटाणे यांची उधळण केली जाते. उपस्थित लोक ते उचलतात. या अग्नीतून मक्याच्या लाह्या वा शेंगदाणे जो कोणी उचलतो त्याची इच्छा पूर्ण होते, अशी समजूत आहे.