या सिनेमाचे दिग्दर्शन रवी उद्यावर यांनी केलं असून सिनेमाचे निर्माते बोनी कपूर आहेत. या सिनेमात अक्षय खन्ना, अभिमन्यू सिंह यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर सिनेमामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे. याव्यतिरिक्त सिनेमामध्ये दोन पाकिस्तानी कलाकारांचाही समावेश आहेत. सिनेमा हिंदी भाषेसोबत तामिळ आणि तेलुगु भाषांमध्ये 14 जुलैला रिलीज करण्यात येणार आहे.