श्रावण मास चतुर्थी: गणपतीच्या आशीर्वादाने नकारात्मकता दूर करा

आज श्रावण महिन्याची संकष्टी चतुर्थी आहे. तर जाणून घ्या या दिवशी काय केल्याने गणपतीची आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ शकेल-
 
संध्याकाळी गणपती आणि देवी गौरीची पूजा करावी.
या दिवशी गणपतीची पूजा करताना दूर्वा अर्पित करा आणि मोदक किंवा पिवळ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवा.
व्रत सोडताना गोड खाऊन उपास सोडावा.
या दिवशी अन्न ग्रहण न करता फळाहार करावा.
या दिवशी गणपतीची पूजा केल्याने नकारात्मकता दूर होते.
ज्यांना नकारात्मक जाणवत असेल त्यांनी या दिवशी घरात पांढर्‍या रंगाच्या गणपतीची मूर्ती स्थापित करावी. गणपतीचं पूजन करताना स्वत:च मुख पूर्वीकडे किंवा उत्तर दिशेकडे असावं. आसनावर बसूनच गणपतीची पूजा करणे श्रेष्ठ ठरेल. इतर भक्त लाल रंगाचे वस्त्र परिधान केलेल्या गणपतीची पूजा करू शकतात.
तसेच गणपतीला तिळाने तयार पदार्थ, तीळ गुळाचे लाडू किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवावा.
नैवेद्या ऋतू फळ अर्पित करणे देखील योग्य ठरेल. 
गणपती पूजन दरम्यान धूप-दीप इत्यादीने श्रीगणेशाची आराधना करावी. 
फळ, फुलं, रोली, मोली, अक्षता, पंचामृत इत्यादीने श्रीगणेशाची विधिपूर्वक पूजा करावी.
गणपतीला शेंदूर अर्पित करावे. 
या दिवशी रात्री तांब्याच्या लोट्यात लाल चंदन, कुश, दूर्वा, फुलं, अक्षता, दही आणि जल मिसळून चंद्राला 7 वेळा अर्घ्य द्यावं- अर्घ्य देताना हा मंत्र म्हणावा -
गगनार्णवमाणिक्य चन्द्र दाक्षायणीपते।
गृहाणार्घ्यमया दत्तं गणेशप्रतिरूपक।।
 
अर्थात गगनरूपी समुद्राचे माणिक्य, दक्षकन्या रोहिणीचे प्रियतम आणि गणेशाचे प्रतिरूप चंद्र! माझ्या द्वारे अर्घ्य स्वीकार करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती