सुनटनर्तक अवतार : शंकराने या प्रकारे पार्वतीच्या पालकांना केले होते प्रसन्न

शुक्रवार, 3 जुलै 2020 (15:38 IST)
शिव पुराणात भगवान शिवाचे अनेक अवतारांचे वर्णन आढळतात. कुठे कुठे तर त्यांचे 24 तर कोठे त्यांचे 19 अवतारांचे उल्लेख आहे. तसे शिवाचे अंशावतार देखील बरेचशे झाले आहेत. शिवाचे काही अवतार तंत्रमार्गी आहेत तर काही दक्षिणमार्गी आहेत. चला तर मग जाणून घेऊया शिवाच्या सुनटनर्तक अवताराची छोटीशी कहाणी.
 
सुनटनर्तक अवतार : पार्वतीच्या वडील हिमाचलांकडून त्यांच्या मुलीच्या मागणीसाठी शिवाने सुनटनर्तकाचे वेष घेतले होते. हातात डमरू घेऊन शिवाजी नटाच्या रूपात हिमाचलच्या घरी पोहोचून नाचू लागले.
 
नटराज शिवाने एवढे छान आणि सुंदर नृत्य केले की सर्व आनंदित झाले. हिमाचलांनी त्यांना भिक्षा मागण्यास सांगितले तर नटराज शिवांनी भिक्षेत पार्वतीला मागितले. या वर हिमाचलराज क्रोधित झाले. काही वेळानंतर नटराज वेष घेतलेल्या शिवाने आपले खरे रूप पार्वतीला दाखवून निघून गेले. त्यांच्या गेल्यावर मैना आणि हिमाचल यांना दैवी ज्ञान झाले आणि त्यांनी पार्वतीला शिवाला देण्याचे ठरविले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती