बेलपत्रात तीन पान असावे. पत्र खंडित नसावे. प्रथम बेलपत्र स्वच्छ पाण्याने चांगले धुवावे. एकतर आपण त्यावर टिळक लावू शकतो तसेच आपल्या श्रद्धेनुसार पानावर 'ओम' किंवा 'ओम नमः शिवाय' हे ही लिहू शकतो. नंतर बेलपत्राचा गुळगुळीत पृष्ठभाग शिवलिंगाला स्पर्श करून अर्पण करावा. या दरम्यान ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा.
धार्मिकदृष्ट्या बघितले तर असा विश्वास आहे की बेलपत्राचे तीन पान महादेवांचे त्रिनेत्र किंवा त्रिशूल असल्याचे प्रतीक आहे. काही जागी ह्यांना ब्रह्मा, विष्णू, महेश असे ही म्हटलं आहे. बेलपत्राचे तीन पान म्हणजे मनुष्य स्वभावाचे तीन मूळ गुण अर्थातच तम, रजस आणि सत्व. तिन्ही गुण आपल्या विचार, भावना, कृती आणि जीवनावरील प्रतिक्रियांवर प्रभाव टाकतात. अशात बेलपत्र अर्पण करणे म्हणजे हे सोडून भौतिक वस्तूंचा वर जाऊन महादेवाच्या भक्तीमध्ये स्वतःला समर्पित करणे.