श्राद्धाची वेळ 'कुपत' काळ आहे म्हणजेच दिवसाच्या मध्यान्ह काळी (दुपारी 12-30च्या आसपास) श्राद्ध केले गेले पाहिजे. याचे आमंत्रण आदल्या दिवशी पुरोहिताच्या घरी जाऊन आदराने द्यावे. ब्राह्मणांची संख्या एक, तीन, पाच अशी विषम असावी. प्रथम त्यांना हात, पाय धुवायला पाणी द्यावे. नंतर आचमन करून त्यांना आसनावर बसवून प्रेमाने वाढावे. वाढतांना शांत असावे, रागावू नये. मनात श्रद्धा, विश्वास हवा. जेवणानंतर मुख-शुद्धी तसेच दक्षिणा, वस्त्र, रत्न, पात्र या सारखे आपल्या ऐपतीप्रमाणे (यथाशक्ती- दान करावे. ब्राह्मण व आमंत्रितांच्या जेवणानंतर गरीब, तसेच अनाथांनाही संतुष्ट करावे. यामुळे ते यमपुरी (स्वर्गात) जाऊन मृतात्मांची मदत करतात. अनाथाला दिलेले अन्नदान अक्षय होते, असे वराहपुराणात लिहिले आहे. महत्वपूर्ण अशा श्राद्धकर्मात खालील गोष्टी महत्वाच्या तसेच पवित्र व पुण्यकारक मानल्या गेल्या आहेत, त्या पितरांना अतिशय प्रिय आहेत.