Shraddha Paksha 2023 पितृ पक्ष किंवा श्राद्ध पक्ष भाद्रपद पौर्णिमेपासून सुरु होतं. हे 16 दिवस म्हणजे भाद्रपद अमावस्या पर्यंत असतं. या वर्षी पितृ पक्ष Pitru Paksha Starting Date ची सुरुवात 29 सप्टेंबर, शुक्रवार पासून होत आहे आणि याचे समापन 14 ऑक्टोबर सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी होईल. पितृ पक्षाच्या काळात पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध विधी पितरांसाठी केले जातात. असे केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळे ते आनंदी होतात. पूर्वज प्रसन्न असतील तर वंशजांचेही कल्याण होते, असे म्हणतात. पितृ पक्षाबाबत अशी मान्यता आहे की या काळात पितर कावळ्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात. या काळात काही काम करण्यास मनाई आहे. चला तर मग जाणून घेऊया पितृ पक्षाच्या काळात काय करू नये.
पशु-पक्ष्यांना त्रास देऊ नये
या दरम्यान पशु-पक्ष्यांना त्रास देऊ नये. असे केल्याने पूर्वज नाराज होत असल्याचे मानले जाते. पितृ पक्षात जनावर आणि पक्ष्यांची सेवा केली पाहिजे.