सर्वपितृ अमावस्या श्राद्धमध्ये पंचबली भोग लावल्याने पितृ प्रसन्न होतील

सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (12:48 IST)
जर आपण 16 दिवसांच्या श्राद्धात पिंडदान, तर्पण, ब्राह्मण भोज इतर कर्म करु शकला नसाल तर सर्वपितृ अमावस्येला हे कर्म करु शकता. जर हे कर्म करणे देखील शक्य नसेल तर आपल्या पंचबली कर्म नक्की केले पाहिजे याने पितृ तृप्त होतात.
 
पंचबलि संकल्प : भोजन तयार झाल्यावर एका ताटात 5 जागी जरा-जरा अन्न वाढून हातात जल, अक्षदा, पुष्प, चन्दन घेऊन हे संकल्प करावं.
 
अद्यामुक गोत्र अमुक (आडणाव इतर) अहममुकगोत्रस्य मम पितुः (मातुः भ्रातुः पितामहस्य वा) वार्षिक श्राद्धे (महालय श्राद्धे) कृतस्य पाकस्य शुद्ध्यर्थं पंचसूनाजनित दोष परिहारार्थं च पंचबलिदानं करिश्ये।.. आता पाणी सोडावं.
 
अमुक याऐवजी गोत्र आणि नावाचं उच्चारण करावं.
 
पंचबली कर्म : 1.गोबली, 2. श्वानबली, 3. काकबली‍, 4. देवादिबली आणि पाचवं पिपीलिकादिबली
 
पंचबली विधि :-
 
1. गोबली : मंत्र म्हणत गायीच्या समक्ष तिच्या वाटेचं भोजन पत्रावळीवर ठेवावं. ठेवताना मंत्र म्हणावा- ॐ सौरभेय्यः सर्वहिताः पवित्राः पुण्यराशयः। प्रतिगृह्वन्तु मे ग्रासं गावस्त्रैलोक्यमातरः।। इदं गोभ्यो न मम।
 
2. श्वानबली : याच प्रकारे कुत्र्याच्या वाटेचं भोजन पत्रीवर ठेवून मंत्र म्हणावं :- द्वौ श्वानौ श्यामशबलौ वैवस्वतकुलोöवौ। ताभ्यामन्नं प्रयच्छामि स्यातामेताव हिंसकौ।। इदं श्वभ्यां न मम।
 
3. काकबली : कावळ्यासाठी स्वच्छ जमिनीवर किंवा छतवर अन्न आणि पाणी ठेवून मं‍‍त्र म्हणा- ॐ ऐन्द्रवारूणवायव्या याम्या वै नैर्ऋतास्तथा। वायसाः प्रतिगृह्वन्तु भूमौ पिण्डं मयोज्झितम्।। इदमन्नं वायसेभ्यो न मम।
 
4. देवादिबली : देवतांसाठी पत्रीवर अन्न आणि पाणी ठेवून मंत्र म्हणा- ॐ देवा मनुष्याः पशवो वयांसि सिद्धाः सयक्षोरगदैत्यसंघाः। प्रेताः पिशाचास्तरवः समस्ता ये चान्नमिच्छन्ति मया प्रदत्तम्।। इदमन्नं देवादिभ्यो न मम। यानंतर ते अग्नीच्या सपुर्द करावं.
 
5. पिपीलिकादिबली : याचप्रकारे एका पत्रीवर मुंगी, कीटक इतरांसाठी त्यांच्या बिलाजवळ अन्न ठेवा आणि मंत्र म्हणा- पिलीलिकाः कीटपतंगकाद्या बुभुक्षिताः कर्मनिबन्धबद्धाः। तेषां हि तृप्त्यर्थमिदं मयान्नं तेभ्यो विसृष्टं सुखिनो भवन्तु।। इदमन्नं पिपीलिकादिभ्यो न मम।

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती