८३ व्या साहित्य संमेलनास पुण्यात सुरुवात

वेबदुनिया

शुक्रवार, 26 मार्च 2010 (17:23 IST)
पुण्यातील विंदा करंदीकर साहित्य नगरीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सारस्वतांच्या उपस्थितीत ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास सुरुवात झाली आहे.

पुण्यात मागील 45 वर्षांपासून पुस्तक विक्री करणाऱ्या एका विक्रेत्यालाही अध्यक्षांसोबत दिपप्रज्वलन करण्याचा बहुमान देण्यात आला. संमेलनाचे अध्यक्ष द भी कुलकर्णी, संमेलनाचे उद्घाटक ना धो महानोर, पुण्याचे पालकमंत्री अजित दादा पवार, ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू, पुण्याचे महापौर मोहन सिंग राजपाल यांनी या प्रसंगी दिपप्रज्वलन केले.

सोहळ्यास उपस्थित माजी ११ संमेलनाध्यक्षांचाही या प्रसंगी सत्कार करण्यात आला. आनंद यादव यांचाही यात समावेश असल्याने -उपस्थित साहित्यिकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा