आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करून इतिहास रचणार्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला 'भारत रत्न' पुरस्कार देऊन सन्मानीत करावे, अशी मागणी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षातर्फे केली जात आहे.
सचिनने आपल्या 20 वर्षांच्या करियरमध्ये अनेक विश्व विक्रमांना गवसनी घातली आहे. भारताला सचिनवर गर्व आहे. त्याच्या विश्व विक्रमांनी भारताचे नाव उज्ज्वल केले आहे, त्यामुळे सचिनला 'भारत रत्न' पुरस्कार दिला जावा, असे पक्षाचे प्रवक्ता मदन बाफना म्हणाले.