सचिनचे 'वन-डे'मध्ये 20 वर्ष पूर्ण

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 वर्ष आज (ता.18) रोजी पूर्ण केले. श्रीलंकेविरुद्धच्या नागपूर येथील दुसर्‍या सामन्यात त्याने ही कामगिरी केली. ही कामगिरी करणारा सचिन हा दुसरा खेळाडू आहे. मागील महिन्यात त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 20 वर्ष पूर्ण केली होती.

कसोटीतील सर्वाधिक काळ खेळण्याचा विक्रम सचिन मोडू शकणार नाही. परंतु एकदिवसीयचा विक्रम तो पुढील वर्षी मोडू शकेल. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा जावेद मियॉदाद याने 20 वर्ष 272 काढली आहे.

सचिनने 18 डिसेंबर 1989 रोजी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पहिल्या सामन्यात तो केवळ दोन चेंडू खेळून वकार युनूसच्या चेंडूवर बाद झाला.

कसोटीत सचिन लवकर यशस्वी ठरला. त्याने नवव्या सामन्यात शतक केले होते. परंतु एकदिवसीय क्रिकेटमध्ये 79 व्या सामन्यात त्याने शतक केले. आतपर्यंत सचिनने 426 सामन्यात 45 शतक आणि 92 अर्धशतकांसह 17247 धावा केल्या आहेत. सलामीला आल्यानंतर सचिन 314 सामने खेळला असून त्यात त्याने 41 शतक आणि 14131 धावा केल्या आहेत. सचिनच्या उपस्थितीत भारत 218 सामने खेळला आहे. या सामन्यांमध्ये त्याचे दहा हजारपेक्षा जास्त धावा आहेत.

मियॉदादच्या नावावर सहा विश्वकरंडक स्पर्धा खेळण्याचा विक्रम आहे. सचिन आतपर्यंत पाच स्पर्धा खेळला असून सन 2011मध्ये भारतात होणार्‍या विश्वकरंडकमध्ये मियॉदादची तो बरोबरी करेल.

वेबदुनिया वर वाचा