'माझी खरी किमत आणि ताकद क्रिकेट आहे. क्रिकेटमुळे माझ्याजवळ अनेक कंपन्यांच्या जाहिराती आहे. यामुळे पैसा नव्हे, क्रिकेटलाच माझे प्राधान्य आहे. चांगले खेळत राहणे हे माझे काम आहे,' असे उदगार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने काढले.
एका मुलाखतीत सचिन म्हणाला, की माझ्याजवळ अनेक कंपन्यांच्या जाहिराती आहे, हे खरे आहे. परंतु हे सर्व क्रिकेटमुळेच आहे. माझे काम चांगले खेळणे असून अन्य कोणत्याही बाबींची चिंता करण्याची मला गरज नाही. सर्वच खेळाडू खेळाला प्रथम प्राधान्य देतात, त्यानंतर जाहिराती येतात.
क्रिकेटमध्ये 20 वर्षे पूर्ण केल्यानंतर काय वाटते? या प्रश्नावर सचिन म्हणाला,' वयाच्या 16 व्या वर्षांपासून ते 37 वर्षांपर्यंतचा प्रवास खूप मोठा आहे. या दरम्यान मी परिपक्व झालो आहे. आता क्रिकेट मी चांगल्या पद्धतीने समजू लागलो आहे.'
भारतात क्रिकेट केवळ एक खेळच नाही, त्याला धर्माचा दर्जा मिळाला आहे. फॅन्सला संघाच्या चांगल्या कामगिरीची अपेक्षा असते. आमच्या विजयात त्यांना आनंद होतो आणि पराभवात दु:ख होते. यामुळे याची तुलना कोणत्याही इतर बाबींशी करता येणार नाही, असे साचिनने सांगितले.