एकटा सचिन दहा जणांना भारी

विक्रमांचा बादशाह असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर संघातील इतर दहा खेळाडू मिळूनही वजनदार ठरत आहे. आकडेवारीमध्येच हे सिद्ध होत असल्यामुळेच 'दस पर भारी सचिन का म्हणावे लागत आहे.

सर्वाधिक धावांचा, सर्वाधिक शतकांचा विक्रम आपल्या नावावर केल्यानंतर सचिन तेंडुलकरने पहिल्या द्विशतकाची नोंदीही आपल्या नावावर केली. सचिनचा धावा आणि शतकांची बेरीज करता इतर दहा सदस्य एकीकडे आणि एकटा सचिन एकीकडे अशी बाब ठरत आहे.

सचिनने 442 एकदिवसीय सामन्यात 17598 धावा केल्या आहेत. त्यात 46 शतक आणि 93 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 1927 चौकारही मारले आहे. सचिनच्या या विक्रमामुळे ग्वाल्हेर वन-डेमधील इतर दहा सदस्य मिळूनही त्यांचा विक्रम अपूर्ण ठरत आहे. इतर दहा सदस्यांनी मिळून 16727 धावा केल्या असून त्यात 23 शतक आणि 98 अर्धशतकांचा समावेश आहे.

इतर दहा सदस्यांचा धावा : वीरेंद्र सेहवाग 6813, महेंद्रसिंह धोनी 5237, सुरेश रैना 2165, विराट कोहली 790, दिनेश कार्तिक 758, यूसुफ पठाण 301, रवींद्र जडेजा 300, प्रवीण कुमार 201, आशीष नेहरा123 आणि शांतकुमारन श्रीसंत 39

वेबदुनिया वर वाचा