24 फेब्रुवारीला युक्रेनवर झालेल्या हल्ल्यानंतर लगेचच हा प्लांट रशियाने ताब्यात घेतला होता आणि सध्या युक्रेनचे कामगार येथे काम करत आहेत. सरकारी एनर्जीटोमने म्हटले आहे की पॉवर युनिट (अणुभट्टी) क्रमांक-6 ग्रीडमधून अनलोड आणि डिस्कनेक्ट करण्यात आली आहे. बंद करण्यात आलेल्या प्लांटमध्ये बसवण्यात आलेल्या सहा अणुभट्ट्यांपैकी हे शेवटचे युनिट होते.