अहमदाबादमध्येही बॉम्बस्फोट

WDWD
बंगलूरूमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर दुसऱ्याच दिवशी अहमदाबादमध्येही दहशतवाद्यांनी सलग सोळा स्फोट बॉम्बस्फोट घडवून आणले.मुंबई हल्ल्यांपूर्वीचा हा मोठा दहशतवादी हल्ला होता. हल्ल्यात तीस जणांचा मृत्यू झाला.

अहमदाबादच्या मणिनगर, ईशानपूर, नारोळ सर्कल, बापूनगर, हटकेश्वर, सारंगपूर ब्रिज, सारकेज व आढाव या भागात हे कमी तीव्रतेचे बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले.

बेंगलूरूमध्ये 25 जुलै रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर दुसऱ्याच दिवशी अहमदाबादमध्ये साखळी स्फोट घडवून दहशतवाद्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बेंगलूरू स्फोटात दोघांना बळी गेला होता.

अहमादाबेत एकाच दिवशी सोळा स्फोट झाले. साकरेज भागात सीएनजी बसमध्ये स्फोट झाला. जयपूर बॉम्बस्फोटात (13 मे) सायकलवर स्फोटके लादून 65 घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटाप्रमाणेच येथेही काही ठिकाणी सायकलवर स्फोटके लादून स्फोट घडवून आणले आहे. काही ठिकाणी टिफीनमध्यें स्फोटके ठेवण्यात आली होती.

बॉम्बस्फोटानंतर ई-मे

शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याअगोदर इंडिया टीव्हीच्या कार्यालयात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा धमकीचा ई-मेल पाठवला होता.

मणिनगर हे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. मोदींना याअगोदरही दहशतवाद्यांकडून धमक्या आल्या होत्या.

वेबदुनिया वर वाचा