Safety Tips for Kids : प्रत्येक पालकांना अनोळखी व्यक्तींबद्दल मुलांना या गोष्टी सांगाव्या

बुधवार, 7 सप्टेंबर 2022 (09:05 IST)
जेव्हा आपल्या मुलांच्या सुरक्षिततेचा विचार केला जातो तेव्हा आपण प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवले पाहिजे.मुलांना, विशेषतः, अनोळखी लोकांशी कसे बोलावे हे नेहमी शिकवले पाहिजे.न घाबरता परिस्थितीला कसे सामोरे जावे हे मुलांना सांगावे लागेल.काही वेळा मुलांचा गैरफायदा घेऊन त्यांना फूस लावण्याचा प्रयत्न करतात.अशा परिस्थितीत अनोळखी लोकांचे शब्द कसे टाळायचे आणि खोटे आणि सत्य यात फरक कसा करायचा हे तुम्ही त्यांना समजावून सांगणे फार महत्वाचे आहे.या गोष्टी त्यांना समजावून सांगाव्यात. 
 
1 अनोळखी लोकांपासून अंतर ठेवा -
मुलांना सांगा की त्यांना अनोळखी व्यक्तींजवळ जाण्याची गरज नाही.जर कोणी त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी दूर जावे.मुलांना शारीरिक स्पर्शापासून दूर राहण्यास सांगा. 
 
2 चांगला आणि वाईट स्पर्श-
 मुलांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यातील फरक समजावून सांगा.प्रत्येक पालकाने वेगवेगळ्या प्रकारे स्पर्श करणे म्हणजे काय हे स्पष्ट केले पाहिजे.त्यांना कोणी अनुचित प्रकारे हात लावला तर त्यांना हे घरी सांगायला सांगा. 
 
3 ओळखीच्या लोकांपासून सावध राहा- 
 मुलांना अनोळखी व्यक्तींबद्दल केवळ चेतावणी देण्याची गरज नाही, तरओळखीच्या लोकांपासून देखील मुलांना सावधगिरी बाळगायला सांगावे.ओळखीतील लोकांनी जर दुर्व्यव्हार केला तर मुलांना गप्प बसण्याऐवजी चुकीच्या गोष्टींविरुद्ध बोलायला शिकवा. 
 
4 रोल प्ले -
मुलांसोबत रोल प्ले करा ज्यामध्ये तुम्ही अनोळखी व्यक्तीचे पात्र साकारता आणि तुमच्या भूमिकेने मुलांना अनोळखी व्यक्तीचे चुकीचे वागणे कसे ओळखावे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करा.रोलप्ले च्या माध्यमातून  मुलांना घाबरवण्याची गरज नाही, तर त्यांना समजून सांगावे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती