Dohale Jevan Wishes In Marathi डोहाळे जेवण शुभेच्छा

मंगळवार, 15 एप्रिल 2025 (18:07 IST)
ही वेळ आहे खूप खास
जपून ठेव प्रत्येक क्षण
आणि जाणवत असलेला बाळाचा श्वास
खास आहे हे अनुभव
सोहळाही खूप अप्रतिम
तुला आणि तुझ्या येणाऱ्या बाळाला 
खूप खूप शुभेच्छा
 
आयुष्यातील सर्वात सुंदर वळण म्हणजे आई होणं. 
ही सुखद बातमी अनुभवण्याची हीच आहे खरी सुरुवात. 
डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा
 
आयुष्य आता पहिल्यासारखे राहीले नसले तरी 
हा बदल खूप आनंद आणि चांगल्यासाठी होत आहेत. 
तुझ्या आयुष्यात येणाऱ्या जगातील सर्व मोठ्या आनंदासाठी खूप-खूप शुभेच्छा.
 
आयुष्यातील सर्वात मोठं सुख आता तुझ्या पदरात पडले आहे. 
आयुष्याच्या या सुंदर भेटीसाठी खूप शुभेच्छा 
 
तुझ्या आणि बाळाच्या आयुष्यात प्रेम, सुख- आनंद आणि समाधान मिळो याच शुभेच्छा
 
बाळासह तुला पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून मनापासून प्रेमळ शुभेच्छा. 
हे क्षण खूप खास आहे म्हणून मनापासून जग. डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा
 
लहान बाळांचे हसणे, बोलणे, आणि त्याचा निरागस सहवास लवकरच तुझ्या आयुष्यात येणार. 
अशात तुझ्या आणि तुझ्या बाळासाठी डोहाळे जेवणाला खास आशीर्वाद
 
या नव्या आयुष्यासाठी खूप शुभेच्छा... 
पुढच्या आयुष्यातील आनंदाचा प्रत्येक क्षण हा बाळासह सुखाने घालव. 
डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा
 
आयुष्यातील सर्वात मोठी भेट म्हणजे लहान बाळ. 
आयुष्यभराचा आहे हा आशीर्वाद, डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा
 
प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील खूप खास क्षण असतात ही
या क्षणासाठी आसुसलेली असते प्रत्येक स्त्री
ही वेळ, अनुभव सर्व मनात जोपासून ठेव. 
डोहाळे जेवण शुभेच्छा
ALSO READ: नवीन बाळाचे आगमन शुभेच्छा New Born Baby Wishes in Marathi
एक वेगळंच संस्मरणीय आणि जादुई असं जग आता तुझ्यासमोर येणार आहे. 
पुढच्या वाटचालीस या डोहाळे जेवणाला तुला खूप खूप शुभेच्छा
 
आपल्या घराच्या अंगणात लहान बाळाच्या येण्याने संपूर्ण आयुष्य बदलून जातं. 
तुला अभिनंदन आणि डोहाळे जेवण शुभेच्छा
 
देव तुला आणि तुझ्या बाळाला उदंड आयुष्य देवो... 
डोहाळे जेवण शुभेच्छा...
 
आयुष्यातील सर्वात मोठा खजिना आता तुझ्या घरी लाभणार आहे.
तुझे घर नव्याने आनंदाने भरो आणि बाळाला सुदृढ आयुष्य मिळो
मनापासून शुभेच्छा

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती