Break up Side Effects हे आहे सीरियस ब्रेकअपचे साइड इफेक्ट

शुक्रवार, 22 सप्टेंबर 2023 (21:20 IST)
ब्रेकअप हा एक कठीण काळ असतो. याचा परिणाम सर्व भावनात्मक लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे होत असतो. आपल्यावरही यातून काही परिणाम होत असेल तर आपलं चित्त दुसरीकडे लावून यातून बाहेर पडावं नाहीतर आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो:
 
काळजीमुळे झोप न येणे
जेव्हा आपल्या जवळच्या माणसाची संपर्क तुटतो तेव्हा त्याची अधिक गरज भासू लागते अर्थातच काळजी वाढते. वैज्ञानिकांप्रमाणे ब्रेकअपने मेंदूचा तो भाग सक्रिय होऊन जातो जो साधारणात कोकिनच्या सवयीमुळे होतो.
 
छाती दुखणे
ब्रेकअपनंतर वेदना संदेश पोहणार्‍या नसा सक्रिय होतात. डोकेदुखीसह ब्रेकअपमध्ये छातीत अधिक दुखतं.
 
स्कीन प्रॉब्लम
तणावामुळे व्यक्ती स्वत:वर लक्ष देत नाही परिणामस्वरूप स्ट्रेस हार्मोन्समुळे स्कीन प्रॉब्लम सुरू होते. एवढेच नाही तर केसही गळू लागतात.
 
स्नायू वेदना
तणावाच्या परिस्थितीत व्यक्ती अधिक खचतो. यामुळे स्नायू वेदनांमुळे शरीरातील अनेक भागांमध्ये वेदना जाणवतात.
 
वजन वाढणे
प्रेमात भूक नाहीसे होते असं ऐकले असेल तर ब्रेकअप झाल्यावर तणावामुळे वजन वाढतं हेही तेवढंच खरं आहे. तणावामुळे झोप न येणे, व्यायाम न करणे आणि पोटाचं आरोग्य बिघडल्यामुळे वजन वाढतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती