लाडक्या मुलीला देवी सीतेशी संबंधित हे सुंदर नाव द्या Unique Baby Girl Name
सोमवार, 5 मे 2025 (13:28 IST)
Unique Baby Girl Name: जर तुम्हालाही तुमच्या लाडक्या मुलीचे नाव एखाद्या देवीच्या नावावर ठेवायचे असेल तर तुम्ही तिला सीता मातेशी संबंधित नाव देऊ शकता. या लेखात सीतेशी संबंधित अनेक सुंदर नावे सुचवण्यात आली आहेत.
सीतांगी - या नावाचा शाब्दिक अर्थ दैवी स्वरूप असा आहे.
रामिता - प्रभू रामाला प्रिय.
पार्थिवी - पार्थवी या नावाचा अर्थ पृथ्वीची कन्या आणि पृथ्वीपासून जन्मलेली असा होतो. सीता माता आणि लक्ष्मी देवी यांना पार्थवी म्हणूनही ओळखले जाते.
भूमिजा - सीतेचा जन्म भूमीतून झाला म्हणून त्यांना भूमीजा असेही म्हणतात. आपण भूमी देखील नाव ठेवू शकता. अर्थात पृथ्वीतून उत्तपन्न.
वैदेही - सीतेचे वडील विदेहाचे राजा होते, म्हणून सीतेचे एक नाव वैदेही झाले.
क्षितिजा - हे नाव सीतेशी संबंधित एक अद्वितीय नाव आहे.
सिया - मुलींसाठी हे नाव खूपच गोंडस असून यूनिक देखील आहे. सिया नावाचा अर्थ देवी सीता, चंद्रप्रकाश, सुंदर स्त्री, पांढरी दुर्वा गवत, चमेली आणि गोड असा होतो.
वानिका - देवी सीता यांच्याशी संबंधित खूपच गोड नाव.
विधिता - याचा अर्थ भाग्यवान असा देखील असतो.
लावण्या - हे नाव सीता देवीची सुंदरता दर्शवते.
जानकी - जनकाची कन्या असल्याने देवी सीतेला जानकी असेही म्हटले जात असे. जानकी नावाचा अर्थ सीता आणि राजा जनक यांची कन्या असा आहे.
जानकीप्रिया - हे पारंपारिक नाव मुलींना देता येऊ शकतं. जानकी प्रिया नावाचा अर्थ सीतेचे रूप आणि राजा जनकाची प्रिय आहे.
लक्षाकी - हे नाव खूपच यूनिक आणि मॉडर्न आहे. सीतेला लक्ष्की म्हणूनही ओळखले जाते. याचा अर्थ लक्ष्मीसमान देखील असतो.
मैथिली - मैथिली हे नाव बिहार आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. मिथिला राजाची कन्या असल्याने, देवी सीता यांना मैथिली असेही म्हटले जात असे.
मृणमयी - भूमीतून जन्मलेल्या आणि मातीपासून बनवलेल्याला मृण्मयी म्हणतात. सीता माता या नावानेही ओळखली जाते.
सीताशी - सीता देवीला सीताशी देखील म्हटले जाते.
अवनिजा - पृथ्वीची पुत्री सीतेचे एक यूनिक नाव.
सियांशी - याचा अर्थ देवी सीतेचा अंश
रामिता - मनभावन किंवा प्रेमळ
देवांशी - जिला देवाचे सर्व सौंदर्य, शांती आणि प्रेम प्राप्त आहे