शारीरिक संबंध बनवण्यापूर्वी प्रत्येकाला या 7 गोष्टी माहित असाव्यात
शुक्रवार, 10 मे 2024 (18:17 IST)
शाळा-महाविद्यालयांमध्ये खाजगी जीवनाबद्दल कधीच शिक्षण-प्रशिक्षण दिले जात नाही. त्यामुळे लोकांना इच्छा, जवळीक आणि उत्तेजना याविषयी नीट माहिती किंवा समज नसते. इंटरनेटवरून मिळवलेले अपूर्ण ज्ञान निरोगी फिजिकल रिलेशनऐवजी अस्वस्थ करते. जीवनातील या महत्त्वाच्या टप्पयात प्रवेश करण्यापूर्वी महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.
शारीरिक संबंध बनवण्यापूर्वी प्रत्येकाला या 7 गोष्टी माहित असाव्यात
1. सेफ्टी - जर असुरक्षित संबंध ठेवले तर ट्रांसमिटेड डिजीजचा धोका असतो. अशात कंडोमचा वापर करण्याबाबद माहिती असावी. एकाहून अधिक पार्टनरसोबत असुरक्षित संबंधाचे गंभीर परिणाम समोर येऊ शकतात.
2 समजूतदारपणे भविष्याची योजना- असुरक्षित संबंधामुळे नको असलेली गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. याचा परिणाम अकाली जन्म होऊ शकतो. त्यामुळे भविष्यातील नियोजन हुशारीने केले पाहिजे.
3 फिजीकल होण्याचे वेगवेगळे प्रकार- हे एका प्रकाराचे असते अशी लोकांची समजूत असते. अर्थात शारीरिक संबंध म्हणजे इंटर कोर्स करणेच पण असे नाही. शारीरित संबंधांमध्ये ऑर्गनव्यतिरिक्त, ओरल, हात, बोटे, एनस आणि इतर सामील असते. हे कशाही प्रकाराचे असू शकते. इंटर कोर्स मध्ये पार्ट्सचे आपसात जुळणे असते.
4. सुख केवळ मुलांसाठी नाही- माहितीच्या अभावाखाली सुख हे केवळ मुलांसाठी असे मानले जाते. परंतु असे नाही यात दोघांना सुख मिळणे महत्त्वाचे आहे. संबंध दोघांच्या इच्छा आणि उत्तेजना याने सुरु होतात आणि दोघांच्या संतुष्टीने सपंतात.
5. खरं सुख क्लिटॉरिस- अभ्यानुसार 70 टक्क्यांहून अधिक महिला केवळ क्लिटॉरिस उत्तेजनेमुळे सुख प्राप्त करतात. याचा अर्थ असा की केवळ व्हल्व्हाला स्पर्श करण्याच्या पद्धतीवर स्त्रियांचे सुख अवलंबून असते. त्यांनी त्यांच्या जोडीदाराला लिकिंग, पॅटिंग इत्यादीसाठी देखील विचारले पाहिजे.
6. याबद्दल बोलण्यात संकोच करु नये- अध्ययनाप्रमाणे शारीरिक संबंधांबद्दल बोलणे टाळू नये. याउलट कोणाला काय पसंत पडत हे मोकळेपणाने सांगितल्यास कमी वेळात अधिक आनंद मिळू शकतो. सुरुवातीला यावर बोलणे अवघड वाटत असले तरी नंतर अगदी सहज यावर चर्चा करता येऊ शकते.
7. इंटिमेसीसाठी वेळ काढणे गरजेचे- अभ्यास दर्शविते की नातेसंबंधात घनिष्ठता टिकवून ठेवण्यासाठी वेळ काढणे महत्वाचे आहे. सुरुवातीला काही अडचण येऊ शकते. प्रयत्नाने हळूहळू जवळीक निर्माण होते. याचा विचार करून नियोजन करणे गरजेचे आहे. नातेसंबंध जसजसे वाढत जातात, तसतसे जवळीकतेला प्राधान्य देण्यावर भर दिला जातो. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की मिठी आणि चुंबन दोन्ही जवळीक वाढविण्यात महत्वाची भूमिका बजावतात. तुमच्या जोडीदाराशी संपर्क साधण्यासाठी, डेटची योजना करण्यासाठी किंवा संबंध ठेवणे सुरू करण्यासाठी दररोज वेळ काढा. हे नात्यात सुखद अनुभव देण्यास मदत करेल.
अस्वीकरण : चिकित्सा, आरोग्य संबंधी उपाय, योग, धर्म, ज्योतिष इतर विषयांवर वेबदुनिया मध्ये प्रकाशित लेख व समाचार केवळ आपल्या माहितीसाठी आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. या संबंधी कोणतेही उपाय अमलात आणण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.