मिळालेल्या माहितीनुसार अर्धनग्न अवस्थेत आणि संपूर्ण शरीरावर रक्ताने माखलेल्या या तरुणाने संपूर्ण वाळूज औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सोमवारी दुपारी बजाजनगरमध्ये ही घटना घडली. राकेश यादव हा कामगार दुसऱ्या राज्यातील आहे आणि वाळूज औद्योगिक क्षेत्रातील एका खाजगी कंपनीत काम करतो. काही अज्ञात लोकांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांनी त्याला मीनाताई ठाकरे मार्केटमध्ये फक्त अंतर्वस्त्रे घालून अर्धनग्न अवस्थेत सोडून दिले.