मुंबईत अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत महिलांच्या विनयभंगाच्या गुन्ह्यांत चौपट वाढ झाली आहे. यावर्षी पहिल्या 8 महिन्यांत मुंबईत महिलांचे विनयभंग/अश्लील वर्तनाच्या 1254 घटना नोंदवल्या गेली आहेत तर याच कालावधीत 549 महिला-तरुणींवर बलात्कार झाल्याच्या गुन्ह्याची नोंद मुंबई पोलिसांनी केली आहे. तसेच कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळीसारख्या गुन्ह्याच्या घटनांमध्येसुद्धा दुप्पट वाढ झाली आहे.
मुंबईनंतर राज्यात पुण्यात महिलांवर सर्वाधिक लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या असून गेल्या आठ महिन्यांत पुण्यात विनयभंग/अश्लील वर्तनाच्या 364 घटना घडल्या आहेत. याच काळात पुण्यात 124 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. नागपुरातही गेल्या 8 महिन्यांत 304 महिलांच्या विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत; तर 165 महिलांवर बलात्काराच्या घटना नोंदवल्या आहेत.