याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी पतीच्या मोबाईलवरून अनोळखी इसमाचा फोन आला होता. त्याने फिर्यादी यांना “तुमच्या पत्नीचे लग्नानंतर दुसर्या पुरुषाबरोबर अनैतिक संबंध आहेत व त्या दोघांचे 16 अश्लील फोटो, तसेच 8 व्हिडिओ आणि पर्सनल ऑडिओ रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे आहे,” असे सांगितले. त्यानंतर अनोळखी इसमाने फिर्यादी पतीस त्याच्या पत्नीचे अश्लील फोटो पाठवून खंडणीची मागणी केली.
ही मागणी पूर्ण न केल्यास हे सर्व अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे, तर फिर्यादीच्या पत्नीने लग्नानंतर परपुरुषासोबत अनैतिक संबंध ठेवून पतीची चांगली प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने संगनमत केले व साडेचार लाख रुपयांची खंडणी मागून घर नावावर करून देण्याची मागणी केली.
हा प्रकार दि. 16 जून ते दि. 2 ऑगस्ट 2022 या कालावधीत घडला. या प्रकरणी फिर्यादी पतीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना तेथे दाद मिळाली नाही. त्यानंतर पतीने न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार न्यायालयाच्या आदेशानुसार अंबड पोलीस ठाण्यात आरोपी पत्नी व तिच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर करीत आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor