आता टपाल विभाग वाय-फाय सुविधा सुरू करणार

शनिवार, 28 ऑक्टोबर 2017 (09:10 IST)

अतिदुर्गम  गावामध्ये  राहणार्‍या नागरिकांसाठी टपाल विभाग आता वाय-फाय सुविधा सुरू करणार असून, यामुळे  मोबाईलवर इंटरनेटची सुविधा मिळणार आहे. त्यासाठी नागरिकांना संबंधित गावातील टपाल कार्यालयात इंटरनेटचे रिचार्ज घ्यावे लागणार आहे. 

ही सेवा सुरू करण्यासाठी सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ मॅट्रीक्स (सी डॉट) चे सहकार्य घेण्यात आले आहे. हा  प्रायोगिक प्रकल्प टपालच्या पुणे विभागातील अतिदुर्गम भाग असलेल्या खेडेगावात राबविण्यात येणार आहे.या संस्थेने बंगळूरू शहरापासून लांब असलेल्या अतिदुर्गम भागातील खेडेगावात असलेल्या टपाल कार्यालयात  पब्लिक डाटा ऑफिस (पीडीओ) यंत्रणा बसविली. ही यंत्रणा टपाल कार्यालयाच्या  टप्प्यात असलेल्या गावांतील ठराविक  किलोमीटर अंतरापर्यत कशी कार्यरत राहिल यावर भर देण्यात आला. नागरिकांना टपाल  कार्यालयातून ठराविक रकमेचे रिचार्ज कूपन घेण्याची सुविधा सुरू करण्यात आली. हे कूपन नागरिकांनी रिचार्ज केल्यावर नियमानुसार त्यांना मोबाईलवर पासवर्ड आणि युजर आयडी  टाकणे बंधनकारक राहणार आहे. 

या दोनी बाबी टाकल्यानंतरच इंटरनेट कनेक्टिव्हीटी  सुरू होणार आहे. या सुविधेमिळे अतिदुर्गम भागात असलेल्या टपाल कार्यालयांचा आर्थिक व्यवहार वाढण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे या पीडीओचे यंत्रणेचे स्पीड  इतर खासगी कंपन्यांच्या मोबाईल टॉवर पेक्षा जास्त असणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती