"मते पाहिजे असेले की मुस्लिमांजवळ येतात", वारीस पठाण उद्धव ठाकरेंवर का संतापले?

शुक्रवार, 9 ऑगस्ट 2024 (10:11 IST)
वक्फ बोर्ड कायद्यात बदल करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार यांनी बुधवारी लोकसभेत दुरुस्ती विधेयक मांडले. या विधेयकावरून संसदेत प्रचंड गोंधळ झाला. या विधेयकाला विरोधकांनी एकमताने विरोध केला, वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक संसदेत आणले तेव्हा उद्धव गटाचे सर्व 9 लोकसभा खासदार सभागृहा न्हवते.एआयएमआयएमचे राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे.
 
वारिस पठाण म्हणाले की, "लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा उद्धव यांना मुस्लिम मतांची गरज होती. मोठ्या संख्येने मुस्लिमांनी त्यांना मतदान केले, मात्र केंद्र सरकारला या विधेयकाद्वारे मुस्लिमांकडून वक्फची जमीन हिसकावून घ्यायची असताना, त्यावेळी उद्धव यांचे खासदार गायब होते." ते म्हणाले की, "महाराष्ट्रातील मुस्लिम सर्व काही पाहत आहेत. त्यांना जेव्हा मते हवी असतात तेव्हा ते मुस्लिमांकडे मते मागायला येतात, मात्र केंद्र सरकार त्यांच्या हक्कांवर दरोडा टाकत असताना ते गायब आहेत. आगामी काळात मुस्लिम उद्धव यांना उत्तर देतील. विधानसभा निवडणुका देतील, प्रत्येक गोष्टीचा हिशोब होईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती