अशोक खरात यांच्या केबिनमध्ये भोंदू ज्योतिषी/अंकशास्त्रज्ञ म्हणून येणाऱ्या महिलांवर लैंगिक शोषण, बलात्कार आणि विकृत कृत्ये घडायची, असा आरोप आहे. हे प्रकरण मार्च २०२६ मध्ये उघडकीस आले आणि महाराष्ट्रात मोठी खळबळ माजली.
तसेच जोडपे किंवा कुटुंब आले की, प्रथम सर्वांना आत घ्यायचे. नंतर पुरुष/कुटुंबीयांना बाहेर थांबण्यास सांगायचे. “तुम्ही बाहेर जा, मी तिच्याशी एकट्याने विधी करणार” असे म्हणून महिला आत ठेवायचा. आत गेल्यावर झुंबर/लाइट्स बंद करायचे.महिलांना गुंगीचे पाणी/द्रव्य पाजायचे, मंत्र म्हणायचे, डोळे बंद करायला सांगायचे. नंतर मिठी मारणे, अयोग्य स्पर्श, बलात्कार किंवा इतर विकृत कृत्ये करायचे. काही प्रकरणांत स्वतःची लघवी पाजणे, हिप्नोसिस किंवा भय दाखवणे, दैवी शक्ती, साप, टायगर स्किन, प्लास्टिक साप यांचा वापर करून भीती घालणे) असे आरोप आहे. तसेच काही महिलांना गर्भवती करून नंतर गर्भपाताची गोळी देणे, धमक्या देणे, तुझे आणि कुटुंबाचे नुकसान करीन असेही सांगितले जाते.
पर्दाफाश कसा झाला?
खरातच्या एका पूर्व कर्मचाऱ्याने त्याच्या गरोदर पत्नीवर झालेल्या अत्याचारानंतर केबिनमध्ये हिडन कॅमेरा लावला. त्यात ५८ ते १००+ अश्लील व्हिडिओ सापडले, ज्यात अनेक महिलांना भुरळ देऊन अश्लील कृत्ये करताना दिसतात. या फुटेजवर आधारित तक्रारी दाखल झाल्या आणि १८ मार्च २०२६ रोजी खरातला अटक झाली.