पुढचे 3 दिवसात या भागांमध्ये उन्हाचे तीव्र चटके

शनिवार, 23 मे 2020 (11:23 IST)
राज्यात शेवटच्या आठवड्यात विदर्भात उष्णतेची लाट येईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. येत्या 3 दिवसात विदर्भवासीयांना उन्हाचे तीव्र चटके बसणार आहेत. 23 ते 25 मेपर्यंत विदर्भात उष्णतेची लाट येणार असल्यानं हवामना विभागाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
 
मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातही 40 अंश सेल्सियसपर्यंत तापमान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सरासरी कमाल तापमानापेक्षा पारा जास्त राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 
 
महाराष्ट्र राज्यात मागच्या काही आठवड्यांमध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच कोकण भागांमध्ये अवकाळी पाऊस पडला. यामुळे पिकाचे नुकसान झालं होतं. आता अचानक तापमानात वाढ झाली होती. जळगाव, परभणी, नांदेड, सोलापूर, औरंगाबाद या शहरात गेल्या काही दिवसात कमाल तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्यावर गेला तर काही शहरात 44 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद झाली आहे.
 
महाराष्ट्रामधील बरोबरच देशात देखील उष्णतेची लाट पुढील तीन दिवस दिसणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती