मनमाड शहरातील श्रावस्ती नगर भागात अशीच एक घटना घडली असून, घटनेत चोरट्यांनी सामाजिक कार्यकर्ते विलास आहिरे यांनी पिण्यासाठी टाकीत साठवून ठेवलेल्या ३०० लिटर पाण्यावर डल्ला मारला आहे. घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. एकीकडे अगोदरच शहरातील नागरिक भीषण पाणी टंचाईला तोंड देत असताना दुसरीकडे पाणी चोरीच्या या घटनेमुळे नागरिकांना धक्का बसला आहे.