ठाण्यात संतापजनक घटना: खासगी बोलायचे आहे असे सांगून नर्सवर वार्डबॉयचा अत्याचार; वॉर्डबॉयविरुद्ध गुन्हा दाखल

मंगळवार, 7 एप्रिल 2026 (16:55 IST)
ठाण्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या ४१ वर्षीय वॉर्डबॉयने त्याच रुग्णालयातील एका परिचारिकेला (नर्स) विश्वासात घेऊन तिच्यावर दोन वेळा अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
 
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित नर्स आणि आरोपी वॉर्डबॉय हे ठाण्यातील एकाच रुग्णालयात काम करत असल्याने एकमेकांच्या परिचयाचे होते. आरोपीने "तुझ्याशी काहीतरी खासगी बोलायचे आहे" असे सांगून तिला ठाण्यातील हॉटेल येथे नेले. तिथे तिला गुंगीचे औषध मिसळलेले ज्यूस पिण्यास दिले. नर्स बेशुद्ध झाल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला.
 
धमकावून पुन्हा अत्याचार: एवढ्यावरच न थांबता, आरोपीने पीडितेला या घटनेबद्दल कोणाला सांगितल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. याच भीतीचा फायदा घेत त्याने तिला पुन्हा हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हा सर्व प्रकार १६ मार्च ते ५ एप्रिल २०२६ या दरम्यान घडला.
 
पोलिस कारवाई: या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने ठाणेनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी संबंधित वॉर्डबॉयविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती