मुंबई ते पुणे हायपरलूप मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर साडेतीन तासांचा मुंबई-पुणे प्रवास फक्त आणि फक्त 25 मिनिटात पूर्ण करता येणार आहे. अर्थात मुंबईवरुन पुण्याला किंवा पुण्यावरुन मुंबईला जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे तब्बल 3 तास पूर्ण वाचणार आहेत. पुणे व मुंबईमधील अंतर हे जवळपास 150 किलोमीटर असून, या प्रस्तावित प्रकल्पाचा फायदा जवळपास 2 कोटी 60 लाख नागरिकांना होईल, असाही अंदाज वर्तवला जात आहे.सोबतच मुंबई-पुणे हायपरलूप मार्गामुळे पुणे आणि नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळही जोडले जाणार असून, पहिल्या टप्प्यात केवळ 11.8 किलोमीटरचा ‘डेमॉन्स्ट्रेशन ट्रॅक’ उभारला जाणार आहे. त्यामुळे आता स्वप्नवत वाटणारे आता प्रत्यक्षात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ठरणार असून त्यामुळे राज्य एका वेगळ्या प्रगतीच्या वाटेवर जाणार आहे. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून ते स्वतः यामध्ये लक्ष देत आहेत.