मी लढणार आहे, माझ्या वैधव्याला व्यवस्था जबाबदार

शनिवार, 12 जानेवारी 2019 (10:29 IST)
मी विधवा नाही, एक महिला आहे. नवरा कमकुवत होता तो गेला; पण मी लढणार आहे. सध्या शेतकरी आणि लेखकाला भाव नाही.माझ्या वैधव्याला व्यवस्था जबाबदार आहे. अडचणीच्यावेळी दिल्लीतच नव्हे तर गल्लीतही बाईच कामी येते हे पुन्हा सिद्ध झाले, अशा शब्दांत साहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांनी ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी काढले आहेत. उद्घाटनप्रसंगी वैशाली येडे यांनी रिमोटद्वारे बटण दाबून दीपप्रज्ज्वलन केले. 
 
त्यानंतर केलेल्या भाषणात येडे म्हणाल्या की, माझा या जन्मावर विश्वास आहे, त्यामुळे मी रडत नाय तर लढतेय. पुढच्या जन्मी अदानी, अंबानी होईन, असे वाटून पतीने आत्महत्या केली. पण मी हीच वायद्याची शेती, माझ्या हिमतीवर फायद्याची करून दाखवणार हा विश्वास आहे. या व्यवस्थेने माझ्या पतीचा बळी घेतला आणि जगरहाटीने विधवापण लादले असे सांगितले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती