14 वर्षांचा मुलगा गणिताचा प्राध्यापक

लंडन- आजची पिढी प्रचंड शार्प आहे. ज्या पद्धतीने ते प्रत्येक गोष्ट आत्मसात करतात, ते केवळ थक्क करणारेच असते. असे असले तरी 14 वर्षांचा एक मुलगा इंग्लंडमधील विद्यापीठात गणित विषयाचा प्राध्यापक आहे असे सांगितले तर विश्वास बसेल? कन्फयूज झालात ना? पण हे खरे आहे.
 
याशा एस्ले हा इराणी मुलगा पदवीचे शिक्षण घेता-घेता लेस्टर विद्यापीठात प्राध्यापकी करतो. वय वर्ष 14 म्हणजे तसे तर खेळा-बागडायचेच वय. शाळा कधी सुटते आणि कधी मैदानावर पोहोचतो, अशी या वयोगटातील मुलांची अवस्था असते. पण याश हे काही तरी वेगळेच समीकरण आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती