चांगले सरकार असेल तर शिवसेना भाजपा सोबत - उद्धव ठाकरे

शनिवार, 3 नोव्हेंबर 2018 (16:29 IST)
सामना मधून दर दोन दिवसा आड टीका करणारे, सोबतच अनकेदा एकमेकांवर आरोप करणारे शिवसेनेने मात्र अचानक दुसरा पवित्रा घेतला आहे. शिवसेना सत्तेत राहते वर सरकारवरच टीका करते, असा अनेकांचा आक्षेप आहे. मात्र, मी सरकारवर टीका करत नाही तर जनतेच्या बाजूने बोलतो. जनतेच्या हितासाठी मी कोणालाही पाठिंबा द्यायला तयार आहे, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.शनिवारी नाशिक येथील  निफाड येथील विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यात त्यांनी आपले मत व्यक्त केले. व्यासपीठावर भाजपा नेते  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनदेखील उपस्थित होते.
 
काही दिवसांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेल्या तणावाविषयी उद्धव यांनी  भाष्य केले आहे. सध्यातरी दिवाळीचे फटाके बाजूला ठेवूयात आणि चांगले दिवे लावूयात, असे सूचक विधान त्यांनी केले आहे. आपण राम मंदिराच्या भूमीपूजनाला एकत्र जाऊ, असेही उद्धव यांनी म्हटले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी समोपचाराची भाषा सुरू केल्याची चर्चा आहे. तर उद्धव ढाकरे आणि चंद्रकांत पाटील सोबतच गाडीत प्रवास केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती