विकासचे भूत जिवंत हवे सामनातून भाजपवर टीका

मंगळवार, 27 मार्च 2018 (15:41 IST)
दैनिक समना मधून आज भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. यानुसार भाजपा जे दिखाऊ विकास दाखवत असते ती म्हणजे भुताटकी आहे. जी दिसत नाही अशी जोरदार टीका केली आहे. विकास होणार कसा असा प्रश्न देखील उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. नागपुरात अत्याधुनिक पोलीस भवन निर्माण करण्यासाठी मंत्रालयातून निधी आणण्याचे कठीण काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बाबनकुळे यांनी करून दाखवल्याबद्दल गडकरींनी त्यांचे अभिनंदन केले. आम्हीसुद्धा आनंद व्यक्त करीत आहोत. काही झाले तरी विकासाचे भूत जिवंत ठेवायला हवे. पुन्हा भूत अदृश्य असते. त्यामुळे ज्याने त्याने या विकासाच्या भुताटकीचा शोध घ्यावा असाच एकंदर सरकारी अंमलबजावणीचा कारभार दिसतो. अशी जोरदार टीका केली आहे.
असा हे संपादकीय 
नितीन गडकरी हे दिलखुलास बोलतात. त्यामुळेच कदाचित गडकरी हे फाटक्या तोंडाचे आहेत असा आरोप त्यांच्याविषयी केला जातो, पण ते अनेकदा परखडपणे बोलतात व त्यांच्या परखड फटकेबाजीतून भाजपमधील आप्तस्वकीयसुद्धा सुटले नाहीत. गडकरी यांनी आता असे सांगितले आहे की, ‘विकासाच्या चालत्या गाडीत खिळे कसे घुसवायचे याचे एक्सपर्ट महाराष्ट्राच्या मंत्रालयात बसले आहेत.’गडकरी यांनी एक प्रकारे महाराष्ट्रातील नोकरशाहीवर हल्लाबोल केला आहे. राज्याचा विकास लाल फीतशाहीच्या फासात गुदमरला आहे असे गडकरी यांनी सांगितले. म्हणजे त्यांना असे सुचवायचे आहे काय, की महाराष्ट्राचा विकास मंदावला आहे व नोकरशाहीच्या घोड्य़ावर मुख्यमंत्र्यांची मांड मजबूत नाही. नागपुरातील एका भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गडकरी यांनी हे सांगितले. गडकरी यांनी सरकारी बाबूंवर हल्लाबोल करून खळबळ उडवली असली तरी राज्यात त्यांच्याच पक्षाचे सरकार आहे. नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रात युती सरकारच्या काळात मंत्री म्हणून चोख काम केले. त्यांच्या काळात महाराष्ट्रातील रस्ते व दळणवळणाची कामे पुढे गेली. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेसारखे प्रकल्प वेगाने पुढे सरकले. कारण नोकरशाहीचे फालतू लाड करू नका अशी सक्त ताकीदच शिवसेनाप्रमुखांनी दिली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती