Uddhav Thackeray:'मातोश्री'च्या बाहेर घातपात करण्याचा कंट्रोल रुमला फोन

सोमवार, 15 जानेवारी 2024 (15:59 IST)
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास स्थाना बाहेर घातपात करण्याचा माहितीचा फोन महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रूम ला आला. त्या नंतर खळबळ उडाली. या फोन मुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, फोन करणाऱ्या व्यक्तीने ट्रेन ने प्रवास करत असताना ट्रेन मध्ये प्रवास करणाऱ्या 4 ते 5 व्यक्तींचे उर्दूतील संभाषण ऐकून ही माहिती पोलीस कंट्रोल रूम ला दिली. 

तो म्हणाला की सदर व्यक्ती ओह्ह्म्ड अली रोड येथे रूम भाडे तत्वावर  घेणार आहे. ही माहिती मिळाल्यावर मुंबई पोलीस सतर्क झाले आहे. ते या प्रकरणाचा तपास करत आहे.  
 
Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती