नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यात दोन तरुण बुडाले, शोधकार्य सुरु

बुधवार, 20 एप्रिल 2022 (10:53 IST)
नाशिकच्या गंगापूर गावातील सोमेश्वर धबधब्यात दोन तरुण बुडाल्याची घटना घडली आहे .ही घटना मंगळवारी दुपारी घडली आहे. देवकाळी कॅम्प परिसरातील सोमेश्वर मंदिर परिसरात असलेल्या धबधब्यात चौघे जण फिरायला आले होते. चौघांपैकी एकजण पाण्यात पोहण्यासाठी उतरला त्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो बुडू लागला त्याला वाचविण्यासाठी एक दुसरा मित्र पाण्यात उतरला आणि तो ही बुडू लागला. पाहता- पाह्ता ते दोघे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. धर्मेंद्र मेहेर आणि आकाश पचोरी रा. देवकाळी आर्टिलरी असे या मयत तरुणांची नावे आहेत. 
 
गेल्या सहा दिवसांपासून गोदावरी नदीत गंगापूर धरणातून 600 क्युसेक पाणी सोडले जात असून पाण्याची पातळी वाढल्यामुळे अनेक जण पाण्यात अंघोळीसाठी गेले असता पाण्यात बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी देखील गांधी तलावात दोघे जण बुडाल्याची घटना ताजी असता काल मंगळवारी दुपारी ही घटना घडली. घटनेची माहिती मिळतातच पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली असून स्थानिक जीवरक्षकांच्या मदतीने त्यांची शोधाशोध सुरु केली. अद्याप दोघांचा शोध लागला नाही. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती