मिळालेल्या माहितीनुसार या महिला शेतमजूर होत्या, असे अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पाच जण जखमी झाले आहे आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. "भात पेरणी केल्यानंतर २५ महिलांचा एक गट आंब्याच्या झाडाखाली जेवण करत असताना वीज कोसळून मंगलाबाई मोटघरे (४०) आणि वर्षा हिंगे (३३) यांचा मृत्यू झाला," असे अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेत पाच महिला जखमी झाल्या आहे आणि त्यांना रामटेक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. गटातील इतर महिला सुरक्षित आहे.