चंद्रपुरात आकाशातून पडलेल्या वस्तूंचे अवशेष सापडण्याची मालिका सुरूच…

मंगळवार, 5 एप्रिल 2022 (10:19 IST)
चंद्रपूरच्या  सिंदेवाही  तालुक्यात गेल्या शनिवारी रात्री टेलाईट रींग कोसळल्याची घटना घडली होती. याच घटनेनंतर आता अनेक ठीकाणी आकाशातून गोळेही  सापडले होते.त्यात आता आणखीण चौथा गोळा (Fire Ball) सापडल्याची घटना समोर आली आहे.
 
चंद्रपूर (जिल्ह्यातील विविध भागात शनिवारी रात्री आकाशात लाल प्रकाश दिसल्याने कुतूहल वाढले होते. चंद्रपूरमध्ये आकाशातून पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या जळत्या वस्तू दिसल्या. सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथे शनिवारी रात्री 10 च्या सुमारास 8 ते 10 फुटाची लोखंडी रिंग पडली.आकाशातून पडलेल्या ही रिंग बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
 
सॅटेलाईट रिंगनंतर अनेक ठीकाणी गोळा (Fire Ball) सापडल्याच्याही घटना समोर आल्या होत्या. आता आकाशातून पडलेल्या वस्तूंचे अवशेष सापडण्याची मालिका सुरू झाली आहे. सिंदेवाही तालुक्यात सापडला चौथा गोळा (Fire Ball) सापडला आहे. आसोलामेंढा तलावाच्या परिसरात हा चौथा गोळा आढळला आहे. स्थानिकांनी पोलीस ठाण्यात हा जमा करण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती